Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांच्याकडून गरीब कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप

पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांच्याकडून गरीब कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप

पारनेर / भगवान गायकवाड, 
सध्या थंडीची लाट असताना, पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक पै. युवराज पठारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने गरम उबदार ब्लॅंकेटचे वाटप केले. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

थंडीच्या कडाक्याने गरीब कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे लक्षात घेऊन पै. युवराज पठारे यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. पारनेर शहर व परिसरातील अनेक गरीब कुटुंबांना त्यांनी स्वतः हजर राहून ब्लॅंकेट वाटप केले. विशेषतः पारनेर-सुपा रोडवरील गणपती फाटा येथे काही गरीब कुटुंबांना ब्लॅंकेट देण्यात आले. यावेळी पठारे यांच्यासमवेत पारनेर शहरातील त्यांचे सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवराज पठारे यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. थंडीच्या या काळात गरीबांना मदत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे. नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो, असे मत व्यक्त होत आहे.

हा उपक्रम पाहता, इतर लोकप्रतिनिधींनीही असे सामाजिक कार्य करण्याची गरज आहे. थंडीच्या दिवसांत गरजूंच्या मदतीला धावणे ही खरी समाजसेवा आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments