Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी...

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये पोलीस खाते व विद्यार्थी समुदेशन व्हावे यासाठी पारनेर चे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी स्वभाविक जीवना मध्ये कशा प्रकारे यश प्राप्त करावे या विषयी सांगितले. खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून सावध राहावे मोबाईलचा अतिवापर टाळावा तसेच मेसेज फॉरवर्ड करताना विचारपूर्वक करावे . येत्या आगामी काळामध्ये तुम्ही विद्यार्थी देशाचे भविष्य असून तुमच्याकडून खूप आशा आहेत.

        यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खिलारी सर यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कौन्सिलिंग सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल पोपट मोकाते यांच्यासह ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मल्हारी वागसकर सर,विजय सोबले सर, नारायण शेळके सर, अतुल सैद सर,सोबल सर,हिंगडे सर, नितीन ढोकळे, निलेश जासूद सर, रवींद्र मते सर, सुशांत खेडकर, सोनल रोहोकले, श्रीमती नीलम खिलारी मॅडम, सुनील झावरे सर, वैशाली गायके, सुरेखा ठाणगे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या शेवटी निलेश जासूद सर यांनी उपस्थितांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जर कोणी देत असेल तर त्यांनी त्यांची तक्रार पारनेर पोलीस स्टेशन तसेच हेल्पलाइन नंबर 112 तसेच आपली तक्रार विद्यालयातील तक्रार पेटीमध्ये टाकावी तक्रार देणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव हे गुप्त राहील.  – संतोष खेडकर, पोलीस निरीक्षक पारनेर.

🔶🔶🔶🔶🔶🔶
ढोकेश्वर विद्यालयाच्या आवारामध्ये शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर रोड रोमिओंकडून, बाहेरील मुलांकडून होणारा त्रास याचा बंदोबस्त पारनेर पोलीस स्टेशन मार्फत करणार – संतोष खेडकर, पोलीस निरीक्षक पारनेर.

🔶🔶🔶🔶🔶
ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर साहेब यांनी जे मार्गदर्शन केले आहे त्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर पुढील जीवनामध्ये सर्व विद्यार्थी यशस्वी होतील.
– डॉ.भाऊसाहेब खिलारी 
कौसलिंग सदस्य, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments