पारनेर / प्रतिनिधी : पारनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त प्रभारी अधिकारी सोमनाथ दिवटे यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजिटल मीडिया यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे तसेच पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.
सोमनाथ दिवटे यांनी यापूर्वी सुपा पोलीस ठाण्यात काम करताना उल्लेखनीय कामगिरी केली असून, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी कारवाई केल्याची त्यांची ओळख आहे.
पारनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना एपीआय सोमनाथ दिवटे यांनी पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
नवीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



