Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर येथे ऑलिम्पियाड परीक्षेचा केंद्रस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पारनेर येथे ऑलिम्पियाड परीक्षेचा केंद्रस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


पारनेर / भगवान गायकवाड, 

एक्सलंट ऑलिम्पियाड फाउंडेशन पुणे संचलित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिली ते चौथी मराठी,सेमी व इंग्लिश माध्यमासाठी सन 2024 -25 मध्ये घेण्यात आलेल्या ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेचा केंद्रस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पारनेर येथे पार पडला. एक्सलंट ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेसाठी पारनेर तालुक्यामधून १४७० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पारनेर तालुका केंद्रस्तरीय २४० विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले तर १० विद्यार्थी राज्यस्तरीय बक्षिसास पात्र ठरले.शिक्षक तसेच पालकांच्या परीक्षेविषयी असलेल्या विश्वासहर्तेमुळे दरवर्षी खूप विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक असतात.भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुधाकर जाधव प्रमुख अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल गायकवाड पिंपळनेर हायस्कूलचे मुख्याध्यापक रामराव पवार,ऐक्य सेवा सेंटर अध्यक्ष तुकाराम वाखारे साहेब, परिवर्तन क्लासेस पारनेर चे दिलीप कोल्हे,एस एन एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल खडकवाडी च्या संस्थापिका शुभांगी ढोकळे, गाडीलकर बनकर, संतोष साबळे आदी मान्यवर उपस्थित होते एक्सलंट ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेचा शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी नक्कीच खूप उपयोग होतो. मान्यवरांनी गुणवंत बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगून सर्वांचे अभिनंदन केले.कार्यक्रमासाठी संदीप गायकवाड, संतोष साबळे, राजेंद्र खरमाळे,लक्ष्मण गवळी, संतोष ठाणगे,प्रवीण साळवे, युवराज हिलाल, मनीषा शिंदे, मीना मेमाने, रामदास चौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत गट पाटील यांनी केले.ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या प्रतिनिधी प्रिया चौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्याचे आवाहन करण्यात आले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments