Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; आमदार काशिनाथ दाते सर यांच्या...

पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

पारनेर / ता. प्रतिनिधी, 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी पारनेर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत कार्य करणाऱ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये प्रविण मच्छिंद्र बोरगे यांची सामाजिक न्याय संघटकपदी, किरण दत्तात्रय रासकर यांची ओबीसी सेल उपाध्यक्षपदी तर राजेश उत्तम सावंत यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे.

या विशेष प्रसंगी आमदार काशिनाथ दाते सर यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष आर.एस. कापसे सर, जिल्हा महिला कार्याध्यक्षा सुधामती कवाद, तालुका महिला अध्यक्षा सुषमा रावडे, महिला युवती तालुका अध्यक्षा अपर्णा खामकर, सोनाबाई चौधरी, तालुका उपाध्यक्ष संतोष सालके, विठ्ठल कवाद, बाळासाहेब लामखडे, युवक उपाध्यक्ष शिवराज कदम, रमेश वरखडे, रोहीदास लामखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार काशिनाथ दाते सर यांनी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी ही निवड फार महत्त्वाची असून, नवीन जबाबदारी पार पाडताना सर्वांनी प्रामाणिकपणे आणि पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहून कार्य करावे, असे आवाहन केले. त्यांनी नविन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छासोबत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी यशस्वी योगदान द्यावे, असा मोलाचा सल्ला दिला.

या नियुक्त्यांमुळे पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक भक्कम होणार असून, पक्षकार्य अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

🔶🔶🔶🔶🔶🔶
नवनिर्वाचित पदाधिकारी आमदार काशिनाथ दाते सरांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा तळागाळात पोहचविण्यासाठी उत्तम कामगिरी बजावतील असा विश्वास असून त्यांच्या माध्यमातून समाजातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत हीच अपेक्षा. 
– अशोक सावंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अहिल्यानगर 

🔶🔶🔶🔶🔶🔶
आमदार काशिनाथ दाते सरांच्या विधानसभेतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तरुणांचा ओढा वाढलेला असून यापुढील काळात आम्ही सर्व सहकारी या सर्व तरुणांच्या माध्यमातून एक मजबूत व वैचारिक विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी आमदार काशिनाथ दाते सर व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी करणार आहोत. 

– भास्कर उचाळे, अध्यक्ष, पारनेर तालुका युवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments