Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर शहरातील १ कोटी ७५ लाखांच्या विकासकामांना सुरुवात; आमदार दाते सरांच्या शुभहस्ते...

पारनेर शहरातील १ कोटी ७५ लाखांच्या विकासकामांना सुरुवात; आमदार दाते सरांच्या शुभहस्ते भूमिपूजन


पारनेर / ता. प्रतिनिधी,

पारनेर शहरातील मूलभूत सुविधांना चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार दातेंच्या शुभहस्ते झाला. या विकासकामांमुळे शहरातील विविध वस्त्यांमधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाला अधिक सुविधा मिळणार आहेत.


या विकासकामांमध्ये पारनेर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील व्यवहारें वस्ती ते साहेबराव गायकवाड वस्ती रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ३ मधील जामगाव रस्त्यापासून विजय औटी यांच्या घरापर्यंत रस्त्यासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच औटी वस्ती ते ताटळवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रुपये, महाजन वस्ती ते दादाभाऊ गायकवाड घर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २० लाख रुपये, लोणी रोड ते अंबुले वस्ती रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ४० लाख रुपये आणि जामगाव रस्त्यापासून ताटळवाडी मारुती मंदिर रस्त्याच्या सुधारणेसाठी ४० लाख रुपये अशा एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे.


यावेळी आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले, “पारनेर शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांना रोजच्या प्रवासात होणारा त्रास कमी व्हावा, वस्त्यांना जोडणारे रस्ते सुस्थितीत व्हावेत आणि शहराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. या विकासकामांना मंजुरी मिळून आज प्रत्यक्ष कामांचा शुभारंभ होत आहे, याचे समाधान आहे.

विकास हा केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामातून नागरिकांना अनुभवता आला पाहिजे. मंजूर झालेली सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांच्याही विकासकामांबाबत काही सूचना असतील, तर त्या जाणून घेऊन कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, उद्योजक दिलीप दाते, माजी उपनगराध्यक्ष दत्ताशेठ कुलट, विठ्ठलशेठ कावरे, नगरसेवक अशोक चेडे, युवराज पठारे, नवनाथ सोबले, देवराम ठुबे, कांतीलाल ठाणगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, शहर उपाध्यक्ष सुनील गाडगे, उद्योजक मंगेश दाते, महिला शहराध्यक्षा कविता औटी, सुनिताताई सोबले, सोनाबाई चौधरी, शंकर औटी, रभाजी औटी, मारुती शेरकर, अण्णा औटी, अंबुले सर, दत्ता अंतुले, नितीन औटी, दादाभाऊ गायकवाड, गोरख गायकवाड, संजय औटी, प्रवीण औटी, सहदेव तराळ, शांताराम तराळ, अशोक गायकवाड, दयानंद बढे, विनोद बढे, रोहिदास शेरकर, बाळासाहेब देशमाने, नितीन तराळ, मारुती औटी, अभिषेक औटी, अरुण देशमाने, सुभाष देशमाने, शिवाजी देशमाने, प्रदीप नगरे, त्रिंबक औटी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

पारनेर शहरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करणे आणि मूलभूत सुविधांचा विस्तार करणे, या दृष्टीने ही विकासकामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मंजूर कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments