Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरप्रियांशी मृत्यूची व गर्भवती महिलेच्या फरपट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी; आ. दातेंची...

प्रियांशी मृत्यूची व गर्भवती महिलेच्या फरपट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी; आ. दातेंची विधानसभेत मागणी


पारनेर / ता. प्रतिनिधी,  
राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याच्या गंभीर पार्श्वभूमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन (जून-जुलै २०२६) मध्ये औचित्याच्या मुद्द्यावर दोन अत्यंत वेदनादायी घटनांचा विषय सभागृहात मांडत शासनाचे लक्ष वेधले.

आमदार दाते यांनी सुपा (ता. पारनेर) येथील अवघ्या सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत, डोळ्याच्या तिरळेपणावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रियांशीचे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य असतानाही, शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्यात औषधी ड्रॉप टाकल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडून रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.

याचबरोबर राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथील एका गर्भवती महिलेची झालेली फरपटही त्यांनी सभागृहात मांडली. निघोज ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालय, तेथून छत्रपती संभाजीनगर, पुढे मुंबईतील केईएम रुग्णालय आणि अखेरीस वाडिया बालरुग्णालय असा जीवघेणा प्रवास करत आई आणि नवजात बालकाला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आरोग्य यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांची होत असलेली ही गैरसोय अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दोन्ही घटनांची शासनाने उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य व्यवस्थेत प्रभावी सुधारणा कराव्यात, अशी ठाम मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments