Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर आणि मैत्री कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेनिमित्त...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेर आणि मैत्री कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम

पारनेर/ प्रतिनिधी,
हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेचा सण स्त्रियांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान राखतो. हा सण पतीवरील प्रेम आणि आदराचे प्रतीक मानला जातो. या पवित्र सणानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर आणि मैत्री कट्टा, पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर शहरातील क्रीडा संकुल येथे वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम पारनेर नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. 

या उपक्रमात मैत्री कट्ट्याच्या सदस्यांनी वडाच्या रोपाची विधिवत पूजा केली. वृक्षमित्र द्वारकाबाई तबाजी तांबे यांच्या शुभहस्ते वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित मैत्री कट्ट्याच्या सदस्यांना प्रत्येकी एक गुलाबाच्या फुलांचे झाड भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला तसेच सामाजिक एकता आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न झाला.

कार्यक्रमास पारनेरच्या माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, मैत्री कट्ट्याच्या सदस्य मंगल भालेकर, सीमा भालेकर, संगीता भालेकर, मनिषा तांबे, सुवर्णा गट, पठारे ताई, पठारे मावशी यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, सचिव लतिफ राजे सर, शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड, सहदेव पोटघन मेजर, रावसाहेब पवार, मल्हार भालेकर आदी उपस्थित होते. 

या उपक्रमाद्वारे वटपौर्णिमेच्या सांस्कृतिक महत्त्वासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. मैत्री कट्टा आणि पत्रकार संघाच्या या संयुक्त प्रयत्नांचे नागरिकांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

विशेष म्हणजे, वृक्षमित्र द्वारकाबाई तबाजी तांबे यांनी वयोवृद्ध असतानाही पारनेरमधील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांना नियमित पाणी घालून वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुरेखा भालेकर यांच्या हस्ते सोशल पारनेरच्या वतीने शाल आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला. 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments