Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगरमहिला दिनानिमित्त आरोग्याची अनोखी भेट! महाराष्ट्रातील पहिल्या महिला संचालित पेट्रोल पंपावर भव्य...

महिला दिनानिमित्त आरोग्याची अनोखी भेट! महाराष्ट्रातील पहिल्या महिला संचालित पेट्रोल पंपावर भव्य मोफत आरोग्य शिबिर


 
अहिल्यानगर / भगवान गायकवाड 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आणि चौथ्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील पहिलाच व एकमेव महिला संचालित पेट्रोल पंप आराध्या पेट्रोलियम, बोल्हेगाव फाटा (नगर–मनमाड रोड, नागापुर) येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ८ मार्च २०२६, सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पंपाच्या संचालिका सौ. मेघा बनकर/चौरे आणि सौ. मंगल वाघ यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. महिलांनी स्वतः सक्षम होण्याबरोबरच समाजातील इतर महिलांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न मानला जात आहे.
या शिबिरात अंदाजे ₹७,००० किंमतीच्या विविध वैद्यकीय तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्नेहालय केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत.

शिबिरातील प्रमुख सुविधा :
रक्तदाब (बीपी) तपासणी
पल्स व तापमान मोजणी
वजन तपासणी
डोळ्यांची तपासणी
रक्ताच्या विविध तपासण्या
ब्रेस्ट कॅन्सर तपासणी
आवश्यक औषधांचे मोफत वाटप
महिलांमध्ये वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नियमित तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार शक्य होतात, याची जाणीव करून देण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलचे संचालक हनीफ शेख, मानद संचालिका डॉ. तेजस्विनी सोनवणे, मेडिकल ऑफिसर चेतन शेळके आणि ऍडमिनिस्ट्रेटर किरण मानकर यांनी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आरोग्याची कास धरणारा हा उपक्रम महिला दिन अधिक अर्थपूर्ण ठरवणार असून, परिसरातील महिलांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. आयोजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments