माळकुप/प्रतिनिधि,
पारनेर तालुक्यातील माळकुप येथे १०वी व १२वी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षेत नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा माळकुप गावचे विद्यमान सरपंच संजय काळे यांच्या हस्ते तसेच माळकूप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
यामध्ये पूर्व अविनाश काळे हिने बारावी मध्ये ८७ टक्के गुण मिळवले , तसेच संकेत बाबासाहेब नाबगे या विद्यार्थ्यांनी ८९.५०% गुण मिळवून गणित विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवलेले आहे तसेच दहावी मध्ये हर्षल भास्कर काळे ८२.२० टक्के, तनिष्का ज्ञानदेव शिंदे८३ टक्के, मोनिका संजय काळे ६८.६०, केतन ज्ञानदेव शिंदे ७५%, जय गणेश साठे ७३%, प्रवीण संदीप शिंदे ८९.४०, टक्के धनश्री जालिंदर नाबगे ७२ टक्के, ज्ञानेश्वरी शिवाजी गवळी ८४ टक्के, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव माळकुप ग्रामपंचायत च्या वतीने फेटा बांधून तसेच शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी माळकुप गावचे विद्यमान सरपंच संजय काळे यांनी सांगितले की येत्या १५ ऑगस्ट रोजी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी उपसरपंच राहुल सुधाकर घंगाळे, सदस्य जयश्री मारुती शिंदे ,श्रीमती तांबे एस. बी., शिंदे मारुती ठकाजी, सोपान मुकुंद तितर, भास्कर काळे, ज्ञानदेव शिंदे, कुंडलिक नाभगे, लहू गांगुर्डे, आबासाहेब काळे, सदाशिव शिंदे, मोहन सोनवणे, सुदाम शिंदे, ज्ञानदेव शिंदे, यांच्यासह ग्रामस्थ माळकुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.




