सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल; अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
अहिल्यानगर | प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे पाटील यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथील माऊली संकुलात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मोहनराव रोकडे पाटील यांनी सामाजिक आणि सहकार क्षेत्रात केलेल्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या योगदानाचा गौरव म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, जिल्हाध्यक्ष संजय काळे, शिक्षक नेते संतोष खामकर सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत रोकडे पाटील यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव झाल्याने वडगाव सावताळ गावासह पारनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या सन्मानामुळे सामाजिक व सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच या पुरस्कारामुळे त्यांच्या आगामी सामाजिक कार्याला अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोहनराव रोकडे पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.



