Thursday, November 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedवडगाव सावताळ बससेवेच्या शनिवारच्या वेळेत बदलासह डोंगरवाडी व वारनवाडी येथे मुक्कामी बस...

वडगाव सावताळ बससेवेच्या शनिवारच्या वेळेत बदलासह डोंगरवाडी व वारनवाडी येथे मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी



रविंद्रशेठ राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापकांना निवेदन; प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी,

टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील वडगाव सावताळ–खामकर झाप–पारनेर ही एसटी बससेवा आज सुरू करण्यात आली. या बससेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सोयीस्करपणे मिळावा, तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी बसच्या वेळेत बदल करण्यासह दोन ठिकाणी मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते  रविंद्रशेठ राजदेव यांच्या नेतृत्वाखाली एसटी आगार व्यवस्थापकांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या मागणीसत्व वडगाव सावताळ येथून शनिवारी सकाळी ७ वाजता पारनेरकडे जाणारी बस सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कातळवेढा येथे जाणारी मुक्कामी बस पूर्वीच्या व्यवस्थेनुसार डोंगरवाडी येथे मुक्कामी पाठवावी आणि पोखरी येथे थांबणारी गाडी जुन्या मुक्कामाच्या व्यवस्थेनुसार वारनवाडी येथे मुक्कामी पाठवावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणे, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येणे आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणे, या दृष्टीने बससेवेच्या वेळेत व मुक्कामाच्या ठिकाणांत आवश्यक बदल करण्याची गरज निवेदनातून मांडण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, मांडवे गावचे माजी सरपंच जगदीश पाटील गागरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे पोपटराव गुंड आणि मनोज करजेकर उपस्थित होते.

आगार व्यवस्थापक या मागण्यांबाबत काय निर्णय घेतात आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना या बदलांचा लाभ कधी मिळतो, याकडे आता परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments