Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरवडझिरेच्या किर्तन्या मोरे ला नॅशनल कराटे स्पर्धेत कांस्यपदक

वडझिरेच्या किर्तन्या मोरे ला नॅशनल कराटे स्पर्धेत कांस्यपदक


पारनेर / भगवान गायकवाड, 

     उत्तराखंडमध्ये झालेल्या ४थ्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन नॅशनल कराटे स्पर्धेत वडझिरे येथील किर्तन्या मोरे हिला कांस्य पदक प्राप्त झाले आहे. अशी माहिती कराटे कोच सुजित वेताळ यांनी दिली.
     उत्तराखंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ४थ्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये सीकेसी (CKC) पुणे विभागातून दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अर्णव कांबळे आणि किर्तन्या मोरे या विद्यार्थ्यांनी आपल्या गटात कांस्य पदक जिंकले आहे. यासोबतच त्यांनी संपूर्ण भारतातून तिसरा क्रमांक मिळवून सीकेसीचे नाव उज्ज्वल केले आहे.

हे दोन्ही विद्यार्थी सेन्सेई सुजित वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या यशामध्ये सीकेसी महाराष्ट्रचे अध्यक्ष विजय महाडिक आणि सीकेसीचे संस्थापक संतोष मोहिते यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी या विद्यार्थ्यांचे खासदार डॉ.निलेश लंके, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनी पुढील स्पर्धा यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
या यशामुळे पुण्यासह महाराष्ट्राचीही शान वाढली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments