Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरवाढदिवसाचा अनोखा आदर्श: हसन राजे यांच्याकडून वन्यजीवांच्या पाणवठ्यांसाठी जलदान

वाढदिवसाचा अनोखा आदर्श: हसन राजे यांच्याकडून वन्यजीवांच्या पाणवठ्यांसाठी जलदान


पारनेर / भगवान गायकवाड, 

उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता, मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पारनेरमधील सामाजिक कार्यकर्ते व खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन हसन राजे यांनी एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता, त्यांनी वन्यजीवांसाठी तीन हजार लिटर पाण्याचा टँकर देऊन ‘जलयज्ञ’ केला.

पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून ‘वन्य प्राण्यांसाठी घोटभर पाणी’ हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी, पाडळी दर्या, सिद्धेश्वर मंदिर परिसर, चिंचोली आणि भोयरे गांगर्डा येथील वनविभागाच्या तसेच निसर्गप्रेमींनी तयार केलेल्या पाणवठ्यांमध्ये सातत्याने पाणी भरले जाते. याच उपक्रमाला बळ देत हसन राजे यांनी सिद्धेश्वर रोड परिसरातील पाणवठ्यात पाणी सोडून वन्यजीवांना दिलासा दिला.


यावेळी बोलताना हसन राजे म्हणाले की, “वाढदिवस हा आनंद साजरा करण्याचा दिवस असतो, मात्र सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील मुक्या प्राण्यांची होणारी तगमग पाहता, त्यांच्या तृप्तीमध्येच खरा आनंद आहे. जोपर्यंत पावसाळ्याला सुरुवात होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील विविध पाणवठ्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. तसेच, ज्या प्राणी मित्रांना पाणवठे भरण्यासाठी पाण्याची गरज लागेल, त्यांना माझ्याकडून मदत दिली जाईल.”

त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे परिसरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी राजेंद्र करंदीकर, पत्रकार भगवान गायकवाड, बाळासाहेब पातारे, किरण सोनवणे, सुनील औटी, अय्याज राजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढदिवस साजरा करण्याची ही ‘ग्रीन आणि ह्युमन’ पद्धत तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.निसर्गचक्राचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव महत्त्वाचे असतात. मानवी वस्त्यांकडे येणारे वन्यजीव हे अनेकदा पाण्याच्या शोधातच येत असतात. जर त्यांना जंगलातच पाणी उपलब्ध झाले, तर मानवी-वन्यजीव संघर्ष टाळता येतो. पारनेर पत्रकार संघ आणि हसन राजे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे या भागातील वन्यजीवांना उन्हाळ्याच्या कठीण काळात मोठा आधार मिळाला आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments