Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेर‘वारीच्या वाटेवर चालणे म्हणजे संतांच्या विचारांचे आचरण - डॉ. आर. जी. सय्यद

‘वारीच्या वाटेवर चालणे म्हणजे संतांच्या विचारांचे आचरण – डॉ. आर. जी. सय्यद


श्री क्षेत्र पारनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळा.

पारनेर /भगवान गायकवाड, 
“वारीच्या वाटेवर चालणे म्हणजे केवळ पंढरपूरची दिंडी करणे नव्हे, तर संत ज्ञानोबा, संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकोबा, संत सावता आणि संत कबीर अशा समस्त संतांच्या विचारांवर चालणे होय. दैनंदिन जीवनात सत्य, न्याय, नीती, समता आणि बंधुत्वाच्या मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने संतांच्या वाटेवर चालणे आहे,” असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. आर. जी. सय्यद यांनी केले. ते श्री काळभैरव प्रतिष्ठान पारनेर आयोजित श्री क्षेत्र पारनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळा निमित्त वारकऱ्याना निरूपण करत होते.यावेळी खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन हसनसेठ राजे, धोंडीभाऊ पुजारी,बबन शेख, सखाराम औटी, गीताराम औटी, शुभम औटी, भास्कर औटी, एकनाथ चेडे, सतीश परांडे, गीताराम रुईकर, वाबळे सर, सतीश औटी, पांडुरंग खडके, बाजीराव अडसूळ, पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

     इंदापूर येथे पारनेर शहरातील श्री क्षेत्र काळभैरवनाथ दिंडी’च्या मुक्कामावेळी वारकरी बांधवांना संबोधित करताना ते बोलत होते. 
आपल्या मार्गदर्शनात डॉ. सय्यद यांनी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विशेष कार्याचा विशेष उल्लेख केला. “एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे ज्या प्रामाणिकपणे आणि न्यायाच्या मार्गाने काम करत आहेत, तो त्यांच्या वैयक्तिक जीवनातील संतांच्या विचारांचाच प्रभाव आहे. अशा कार्यामुळेच समाजात सकारात्मक बदल घडत आहेत,” असे म्हणताच वारकरी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात या विचारांना दाद दिली.नाशिवंत देह जाणार सकळ, हे वास्तव असले तरी, हे आयुष्य सन्मार्गाने जगायचे की भ्रष्ट आणि बेईमानीच्या मार्गाने, हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हाती आहे,” असे सांगत त्यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत संत तुकोबा, संत कबीर आणि संत शेख महंमद महाराजांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा संदेश दिला. मानवी जीवनाचे यश हे आपण निवडलेल्या मार्गावरच अवलंबून असते, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी हसनशेठ राजे यांनी वारकऱ्यांसाठी शिरखुर्मा प्रसादाचे आयोजन केले होते. डॉ. सय्यद यांच्या या प्रेरणादायी आणि प्रबोधनपर प्रवचनामुxळे वारकरी भारावून गेले होते. ‘वारी’ ही केवळ चालण्याची प्रक्रिया नसून ती एक वैचारिक शुद्धीकरणाची चळवळ असल्याचे उपस्थितांना उमजले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments