Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरश्री क्षेत्र रुद्र शनैश्वर देवस्थान येथे भंडारा उत्सवाचे आयोजन

श्री क्षेत्र रुद्र शनैश्वर देवस्थान येथे भंडारा उत्सवाचे आयोजन


पारनेर / प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावातील हिंगणदरा येथील श्री क्षेत्र रुद्र शनैश्वर देवस्थान येथे भंडारा उत्सवाचे आयोजन उद्या शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. 

दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यातील तिसऱ्या शनिवारी भंडार उत्सवाचे आयोजन करण्यात येते या भंडारा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

 श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर विरोली ते हिवरे कोरडा पायी कावडीचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण गावांमधून ढोल ताशा फटाक्याच्या आतषबाजी मध्ये असुन कावडी मिरवणुकीने या उत्सवाची सुरुवात होणार आहे 

याचबरोबर सकाळी ७ वाजता महाआरती ८ वाजता अभिषेक संपन्न होणार असून दुपारी २ वाजता गणेश महाराज शिंदे यांचा भेदिकाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments