Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरश्री ढोकेश्वर विद्यालयात कृषी दिन साजरा; प्रत्येक विद्यार्थ्यांने एक तरी झाड लावावे-...

श्री ढोकेश्वर विद्यालयात कृषी दिन साजरा; प्रत्येक विद्यार्थ्यांने एक तरी झाड लावावे- सिताराम खिलारी पा.


टाकळी ढोकेश्वर, 

      अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, 1 जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त “कृषी दिन” साजरा केला. या कार्यक्रमात संस्थेचे जेष्ठ विश्वस्त आदरणीय श्री. सितारामजी खिलारी पा. यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कै. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते. शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना केली. कृषी दिनाच्या निमित्ताने अण्णांनी आवाहन केले की, प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावून त्याची जोपासना करावी. या निमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. 
           विद्यालयात आज डॉक्टर्स डे ही साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य व सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, डॉ. विजय पुरी, डॉ. वाकळे, डॉ. अतुल बांडे, डॉ. विजय दातीर, डॉ. मंचरे ही उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने आजच्या कार्यक्रमात सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांच्या वतीने डॉ. विजय पुरी यांनी कृषी दिन व डॉक्टर्स डे या दोन्हीही दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिले. 
            कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कृषी अधिकारी विलासराव गोसावी साहेब व विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब खिलारी यांनी कृषी दिन का साजरा केला जातो. याबद्दल व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात शेतीमध्ये झालेले क्रांती आणि वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले व सर्व डॉक्टरांना जागतिक डॉक्टर्स डे च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
          विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने, मोफत गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. गरीब विद्यार्थी सहायता निधीसाठी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. नीलम खिलारी व श्रीम. सुमन वाळुंज यांनी प्रत्येकी 5000 रुपयाची मदत अण्णांच्या शुभहस्ते विद्यालयाला सुपूर्द केली. अण्णांनी या दोघीही 
 देणगीदारांना धन्यवाद दिले.
       या कार्यक्रमानंतर विद्यालयाने अल्प फी मध्ये सुरू केलेले MHT CET या वर्गाचे उद्घाटन संस्थेचे जेष्ठ विश्वस्त सितारामजी खिलारी पा. व डॉक्टर्स यांच्या शुभहस्ते आणि विद्यालयातील सर्व सेवक वृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भाऊसाहेब हिंगडे यांनी केले. अध्यक्षीय सूचना प्रा. राजेंद्र लोंढे, यांनी तर अनुमोदन श्रीम. सुमन वाळुंज यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अतुल सैद यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. प्रिया डव्हणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. मल्हारी वाघस्कर यांनी केले.
         या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, कृषीमित्र सन्माननीय तारकराम झावरे साहेब, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम. मनीषा गाडगे, नारायण शेळके, संदिप महांडुळे, विष्णू भद्रे, सुनील झावरे, आतिश झावरे, विजय सोबले, अशोक गांगड , शिवाजी नरसाळे, योगेश मांडगे सर, पोपट जगदाळे, महानवर सर, वाघ सर, नितीन ढोकळे, शिंदे मॅडम, दिघे मॅडम, खाडे मॅडम, होरणे भाऊसाहेब, पवन कुटे, अनिता म्हस्के, वैशाली गायखे, सुरेखा ठाणगे, कल्पना जाधव, सोनल रोहोकले, अनुष्का कांबळे, वैशाली ढोकळे, सोनाली माळवदे, बांगर सर, धनश्री निवडुंगे, नारायण हरेल, अमोल गोरे, सुनिता घोडके यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

janshahi.com