Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरसाई मल्टिस्टेट पतसंस्थेला २ कोटी २५ लाख तर साई ग्रामीणला १ कोटी...

साई मल्टिस्टेट पतसंस्थेला २ कोटी २५ लाख तर साई ग्रामीणला १ कोटी ७ लाख नफा; चेअरमन वसंतराव चेडे यांची माहिती



पारनेर : ता. प्रतिनिधी, 

गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ श्री साई मल्टिस्टेट पतसंस्थेला सन २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षात रुपये २ कोटी २५ लाख तर श्री साई ग्रामीण पतसंस्थेला १ कोटी ७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे यांनी दिली. श्री साई मल्टिस्टेट संस्थेच्या ठेवी मार्च २०२६ अखेर ३४ कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे वसुल भाग भांडवल १ कोटी ७ लाख असुन राखीव व इतर निधी ११ कोटी १ लाख आहे. संस्थेचे कर्ज वाटप ३८ कोटी ८ लाख असून बँक शिल्लक व गुंतवणूक रुपये ७ कोटी ३० लाख आहे. तर श्री साई ग्रामीण संस्थेच्या ठेवी मार्च २०२६ अखेर ३७ कोटी ६१ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे वसुल भाग भांडवल १ कोटी ४ लाख असुन राखीव व इतर निधी ६ कोटी ५७ लाख आहे. संस्थेचे कर्ज वाटप ३२ कोटी १९ लाख असून बँक शिल्लक व गुंतवणूक रुपये १३ कोटी ३४ लाख आहे. 

संस्थेने ११ वर्षाच्या कालावधीत सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. सभासदांना आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ठेवी जमा करण्यात आलेले आहेत तसेच विविध प्रकारचे कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा संस्थेने प्रयत्न केलेला आहे. संस्थेच्या ढवळपुरी, चिंचोली, कान्हुर पठार, शिरूर व आळकुटी येथे स्वमालकीच्या प्रशस्त व अद्यावत इमारती आहेत. 

🔶🔶🔶🔶🔶🔶
 संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून संस्थेमार्फत पारनेर, कान्हुर पठार, ढवळपुरी, आळकुटी या शाखांमध्ये सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे, संस्थेच्या माध्यमातून आरटीजीएस, चेक क्लिअरिंग, एस एम एस सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
– प्रशांत बढे, कार्यकारी संचालक श्री साई पतसंस्था पारनेर
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments