Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरसिद्धार्थ वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सिद्धार्थ वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


पारनेर / भगवान गायकवाड, 
      धम्मपद मॉनिस्ट्रीचे संस्थापक कालकथित सुधाकर नगरे यांच्या ५१ व्या जन्म स्मृती दिनानिमित्त पारनेर शहरातील सिद्धार्थ वसतिगृह येथे या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ वस्तीगृहातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदर अभिवादन सभेसाठी खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन राजेंद्र करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन सभा पार पडली. धम्म चळवळीमध्ये सुधाकर नगरे यांचे कार्य संपूर्ण चळवळीला मार्गदर्शक असून चळवळीला ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व होते असे करंदीकर यांनी मनोगतात सांगितले. सदर कार्यक्रमास संविधान व लोकशाही जागर समितीचे सचिन नगरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र पवार सर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष किरण सोनवणे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संपत पवार, भारतीय बौद्ध महासभेच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुनिता नगरे, बौद्ध महासभेच्या तालुका सरचिटणीस सुनंदा साळवे, तालुका कार्यकारणीचे सुखदेव थोरात, संतोष नगरे सर, डॉक्टर अनिता घंगाळे, रमेश गायकवाड, मधुकर नगरे, बालाजी साळवे, दादा जाधव, संविधान व लोकशाही जागर भीमराव घंगाळे, अर्चना घंगाळे, प्रदीप मामा नगरे, सुधीर सोनवणे, सुनील चौधरी, विशाल विधाते, जामगाव चे माजी उपसरपंच सुनील शिंदे, सम्राट तालुका प्रतिनिधी सुनीता शिंदे, अनिल सातपुते, चंद्रकांत गायकवाड, सिद्धांत पवार, सुमेध नगरे, आदित्य नगरे यांच्यासह बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने हजर होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments