पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दगडू भिमाजी कावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच इंदुबाई चत्तर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मंगळवार, दिनांक २ मे रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
ही निवडणूक प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच शितल संतोष कावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक भालेकर यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी दगडू कावरे यांचा एकमेव अर्ज दाखल आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
नवनिर्वाचित उपसरपंच दगडू कावरे यांचा सत्कार सरपंच शितल कावरे, माजी उपसरपंच इंदुबाई चत्तर आणि युवा नेते संतोष कावरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीच्या वेळी सरपंच शितल कावरे, मा. उपसरपंच इंदुबाई चत्तर, वैशाली नखादे, स्वप्नाली ठुबे, तसेच आप्पासाहेब नरोडे, धोंडीभाऊ कावरे, देवराम कावरे, रामदास कावरे, गंगाधर कावरे, संतोष कावरे, पांडुरंग कावरे, सुदाम चत्तर, बाबाजी ठुबे, सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग चत्तर, खजिनदार विशाल कावरे, पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बबन चत्तर, सूर्यभान कावरे, नंदू कावरे, भाऊसाहेब कावरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶
गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सर्वांना सोबत घेऊन सिद्धेश्वर वाडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन. मागील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेली विकासकामे पूर्ण करण्याला आणि गावाच्या प्रगतीसाठी प्राधान्य देऊन, पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. या जबाबदारीच्या पूर्ततेसाठी मी सदैव तत्पर असेन.
– दगडू कावरे (नवनिर्वाचित उपसरपंच, सिद्धेश्वरवाडी)



