Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeटाकळी ढोकेश्वर१ जूनचे औचित्य साधत टाकळी ढोकेश्वर गटात सुमारे ४५० ज्येष्ठ नागरिकांचा अनोखा...

१ जूनचे औचित्य साधत टाकळी ढोकेश्वर गटात सुमारे ४५० ज्येष्ठ नागरिकांचा अनोखा सन्मान!


रविंद्रशेठ राजदेव यांच्याकडून ज्येष्ठांना फेटा बांधून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

टाकळी ढोकेश्वर:

अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि लोकनेते डॉ. निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या नेत्या सौ. सोनियाताई राजदेव यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गटात एक अत्यंत स्तुत्य आणि भव्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. १ जून या तारखेचे औचित्य साधून या गटातील सुमारे ४५० ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांनी स्वतः गावोगावी जाऊन या ज्येष्ठांना मानाचा फेटा बांधून त्यांच्याप्रती आपला आदरभाव व्यक्त केला.

ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी जन्मनोंदीची अचूक सोय नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची जन्मतारीख कागदोपत्री ‘१ जून’ अशीच नोंदवलेली असते. या दिवसाचे महत्त्व ओळखून ज्येष्ठांना त्यांच्या आयुष्यातील एक आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण देण्याच्या उदात्त हेतूने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविंद्रशेठ राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर गटातील नांदूर पठार, पिंपळगाव रोठा, गारगुंडी, कासारे, टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, काकणेवाडी, खडकवाडी, मांडवा, देसावडे, पोखरी, काटाळवेढा या सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली. या संपूर्ण मोहिमेत गटातील सुमारे ४५० ज्येष्ठ नागरिकांना मानाचा फेटा बांधून, प्रेमाने विचारपूस करत त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या वाढदिवसानिमित्त असा अनपेक्षित आणि मानाचा सत्कार झाल्यामुळे अनेक ज्येष्ठांचे डोळे आनंदाने पाणावले होते. तरुण पिढीकडून मिळणारा हा सन्मान आणि कृतज्ञता पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आयोजकांसाठी खूप मोठी पावती ठरली.

खासदार डॉ. निलेश लंके यांच्या जनसामान्यांशी नाळ जोडलेल्या कार्यपद्धतीचा वसा सौ. सोनियाताई राजदेव आणि रविंद्रशेठ राजदेव अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत, हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केवळ राजकारण न करता त्यापलीकडे जाऊन समाजकारण, माणुसकी आणि ज्येष्ठांचा आदर या मूल्यांची जोपासना करण्याच्या या उपक्रमाचे संपूर्ण टाकळी ढोकेश्वर गटात आणि पारनेर तालुक्यात सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments