Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरस्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : आमदार काशिनाथ दाते

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : आमदार काशिनाथ दाते


पारनेरमध्ये पठारे बंधूंच्या ‘नॅचरल डेअरी’चा भव्य शुभारंभ


पारनेर/प्रतिनिधी : 
पठारे बंधूंच्या नॅचरल डेअरीचा शुभारंभ हा पारनेरसाठी अभिमानास्पद क्षण आहे. २० वर्षांपासून सेंद्रीय पद्धतीने दूध पुरवठा करणाऱ्या या कुटुंबाचा नवा व्यवसाय यशस्वी होईल. शुद्ध व नैसर्गिक दुग्धपदार्थ ग्राहकांना मिळतील, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार वाढेल. मी त्यांना शुभेच्छा देतो. असे मत आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले. 

पारनेर शहरात प्रथमच पठारे डेअरी फार्मच्या ‘नॅचरल डेअरी’चा भव्य शुभारंभ सोहळा गुरुवारी १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न झाला. एस.टी. स्टँडसमोर असलेल्या या नवीन डेअरी दुकानात स्वच्छ व उत्तम प्रतीचे गायी-म्हशीचे दूध, तूप, पनीर, खवा, बासुंदी, रसमलाई आदी नैसर्गिक पदार्थ उपलब्ध होतील. २० वर्षांपासून सेंद्रीय खतापासून बनवलेला चारा देऊन निरोगी जनावरांचे दूध पुरवठा करणाऱ्या पठारे बंधूंनी हा नवा व्यवसाय सुरू केला आहे.
उद्घाटन सोहळ्यात पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, डॉ. बाळासाहेब कावरे, सुभाष शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे, बाजार समिती संचालक शंकर नगरे, सुपा माजी उपसरपंच दत्ता नाना पवार, लोकनियुक्त सरपंच लहू भालेकर, नगरसेवक अशोक चेडे, विजय भा. औटी, सागर मैड, नगरसेवक कांतीलाल ठाणगे, प्रगतशील शेतकरी कुंडलिक पठारे, नगरसेवक पै. युवराज पठारे, यशवंत पठारे, तेजस रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶
दूध व्यवसायाच्या माध्यमातून अनेक दिवसापासून कार्यरत आहे पारनेर शहर व परिसरातील ग्राहकांना दुधापासून बनवण्यात येणारी उत्पादने ही नॅचरल पद्धतीची मिळावीत म्हणूनच आम्ही नॅचरल डेरी ची सुरुवात केली आहे यापुढील काळात ग्राहकांच्या पसंतीस उतरू

पै. युवराज पठारे (नगरसेवक, पारनेर)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments