Friday, November 27, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगर'स्नेहश्रद्धा' मनोयात्री पुनर्वसन केंद्र आणि माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक यांचा संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय...

‘स्नेहश्रद्धा’ मनोयात्री पुनर्वसन केंद्र आणि माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक यांचा संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यालयात उत्साहात साजरा!


अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

“निरोगी मन आणि शरीर हेच खऱ्या अर्थाने योगाचे वरदान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात, बौद्धिक जडणघडणीत आणि शारीरिक तंदुरुस्तीमध्ये योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अभ्यासाचा ताण, वाढती स्पर्धा आणि मानसिक नैराश्य दूर करण्यासाठी योगाभ्यास हाच एकमेव उत्तम मार्ग आहे,” असा सूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात उमटला.

स्नेहालय संचलित ‘स्नेहश्रद्धा मनोयात्री पुनर्वसन केंद्र’ (इसळक, अहिल्यानगर) आणि ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे ‘माध्यमिक विद्यालय’ (इसळक-निंबळक) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.

तज्ज्ञांकडून योगाचे धडे आणि प्रात्यक्षिके
या कार्यक्रमात स्नेहालय संस्थेच्या योग प्रशिक्षिका सविता माचलोड (MSC, आर्ट ऑफ लिविंग, नांदेड येथील माजी योगशिक्षक) यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांना योगासनांचे महत्त्व पटवून देत विविध प्रात्यक्षिके करून घेतली. प्राणायाम आणि ध्यान यांमुळे एकाग्रता कशी वाढते, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी ‘मानसग्राम’ प्रकल्पातीचे डॉक्टर नीरज करंदीकर, सौ . दीप्ती करंदीकर, डॉक्टर तेजस्विनी मिस्कीन, डॉ . तेजस्विनी सोनवणे, डॉ.मेघना मराठे मॅडम, प्रवीण मुत्याल, डॉ अंशू मुळे मॅडम या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ऍक्टिव्हिटी आणि प्रोग्रॅम मॅनेजमेंटचे प्रमुख गोपाल ठाकरे, स्नेहालयाचे माजी विद्यार्थी व मेंटेनन्स विभाग प्रमुख अक्षय सजगुरे, प्रकल्प समन्वयक व कार्यकर्ते रमाकांत दोड्डी आणि महिला सोशल वर्कर समीक्षा पवार प्रामुख्याने उपस्थित होते.



शालेय प्रशासनाची लाभली मोलाची उपस्थिती
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वितेसाठी ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय नितीन कोतकर सर आणि संस्थेचे सचिव माननीय गव्हाणे साहेब व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि शाळेतील सेवकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते:

माध्यमिक विद्यालय इसळक निंबळकच्या मुख्याध्यापिका
श्रीमती जांजगे संगीता बन्शीराम सहशिक्षक श्री. कोतकर व्ही एम ,श्री. बांडे पी बी ,श्री. शेख एन ए ,श्रीमती कोतकर एस एम,श्रीमती चौधरी व्ही डी सेवकवृंद आणि६५० विद्यार्थी

स्नेहालय संचलित स्नेहश्रद्धा मनोयात्री पुनर्वसन केंद्र हा भारतातील रस्त्यांवर भटकणाऱ्या बेघर मनोरुग्णांवर मोफत उपचार आणि त्यांच्या पुनर्वसनाचे अत्यंत संवेदनशील कार्य करतो. 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
५०० मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्मिलन:

संस्थेने आतापर्यंत तब्बल ५०० हून अधिक मनोरुग्णांना पूर्णपणे बरे करून, त्यांना त्यांच्या हक्काच्या परिवारात आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी ‘कौटुंबिक पुनर्मिलन’ घडवून आणले आहे.

भविष्यात एकत्र काम करण्याचा संकल्प….
शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये योगाची आणि निरोगी जीवनशैलीची आवड निर्माण करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातही ‘विद्यार्थी विकास’ आणि ‘मानसिक आरोग्य’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर माध्यमिक विद्यालय, इसळक-निंबळक आणि स्नेहालय संस्था एकत्रितपणे सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सामूहिक योगासने करून या दिनाचा आनंद लुटला व कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments