Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरहवामानावर व निसर्गावर आधारित शेती करा : पंजाबराव डख

हवामानावर व निसर्गावर आधारित शेती करा : पंजाबराव डख



टाकळी ढोकेश्वर येथे सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून शेतकरी मेळावा

पारनेर/प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर येथे देवकृपा फाउंडेशन व सुजित झावरे पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य अमोल साळवे यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. स्वर्गीय सुखदेव साळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना निसर्गावर आधारित शेतीचा सल्ला दिला. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने १९९५ पासून महाराष्ट्रातील पाऊस गुजरातकडे सरकला आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले असून, शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे डख म्हणाले. पिकांच्या लावणीपासून कापणीपर्यंत शेतकरी राबतात; मात्र, गारपीट, वादळी पावसामुळे नुकसान होते. यासाठी हवामान अंदाजाचा उपयोग करून निसर्गाविरुद्ध शेती टाळावी, असे त्यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याचं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम अण्णा खिलारी, बाळासाहेब खिलारी, भाजपा पारनेर तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सभापती गंगाराम बेलकर, माजी सभापती अरुणराव ठाणगे, सचिन पाटील वराळ, उद्योजक पंकज सोनवणे, डॉ. श्रीकांत पठारे, विकास उर्फ बंडू रोहकले, दत्ता नाना पवार चेअरमन नारायण झावरे साहेब, माजी सपंचायत समिती सदस्य अमोल साळवे, उदय साळवे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ऍड. बाबासाहेब खिलारी, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे, टाकळी ढोकेश्वर गावचे उपसरपंच रामभाऊ तराळ, माजी सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे संचालक शंकरराव नगरे, शिक्षक नेते प्रवीण झावरे, महिला नेत्या वंदनाताई घोलप, निजाम पटेल खंडू भाईक, मोहन रोकडे, सोमनाथ आहेर, अशोक नऱ्हे, सुभाष वराळ, बापू तांबे, सुरेश निवडुंगे, रवींद्र पडळकर, स्वप्निल राहींज नाना गाढवे, शरद पाटील, शंकर बर्वे, लहानु झावरे, प्रसाद झावरे, शरद गागरे, नवनाथ बिचारे, सतीश गायकवाड आदी मान्यवर व अमोल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्य देवकृपा फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विषयक व हवामान विषयक मार्गदर्शन मिळावे या हेतूने हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे स्व. साळवे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथे शेतकरी मेळाव्याचे खऱ्या अर्थाने आयोजन करण्यात आले.

सुजित झावरे पाटील (माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

janshahi.com