Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेर१ कोटी ८४ लाखांच्या विकासकामांनी जामगावला नवी दिशा; आमदार काशिनाथ दातेंच्या माध्यमातून...

१ कोटी ८४ लाखांच्या विकासकामांनी जामगावला नवी दिशा; आमदार काशिनाथ दातेंच्या माध्यमातून विकासाला वेग



पारनेर / ता. प्रतिनिधी  
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते जामगाव, ता. पारनेर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला. सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतून रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना प्रारंभ झाल्याने गावाच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंत चेडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, उद्योजक दिलीप दाते, सरपंच बाळासाहेब माळी, बाळासाहेब सोबले, सिताराम खोडाळ, बबन पवार, मिनिनाथ शिंदे, प्रसाद मेहेर, समीर मांढरे, मनोज शिंदे, दिनकर सोबले, त्रिंबक पवार, बबन मेहेर, बाबाजी महांडुळे, रमेश आबुज, जालिंदर मेहेर, अरुण धुरपते, रोहीत शिंदे, सागर बर्वे, दत्तात्रय बांगर यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निधीतून गावातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, तसेच विविध वस्ती व शिवार रस्त्यांचे मजबुतीकरण व सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये डिकसळ शिव–सोबले बारव जुना पारनेर रस्ता, भांडगाव रस्ता–मेहर वस्ती रस्ता, पारनेर रस्ता–शिंदे वस्ती रस्ता, कावरे मळा रस्ता कॉक्रीटीकरण, जिजाबापू औटी वस्ती ते पाडळी शिवरस्ता, तसेच मुंजाळ दरा ते बैलटेक वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण, बांगरवाडी व हिलाळ वस्ती परिसरातील रस्ते सुधारणा व मळगंगा परिसर कॉक्रीटीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. याशिवाय काही ठिकाणी नवीन रस्ते खडीकरण व काँक्रीटीकरणाद्वारे विकसित करण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना आमदार दाते म्हणाले की, “पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे मतदारसंघात रस्त्यांचे मजबूत जाळे उभारण्यात यश आले असून आज भुमिपूजन व लोकार्पण होत असलेल्या या रस्त्यांच्या विकासकामांमुळे ऐतिहासिक जामगावची नवी ओळख निर्माण होणार असून दळणवळण अधिक सुलभ होईल. गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे पाऊल जामगावच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.”

या विकासकामांमुळे जामगावच्या प्रगतीला नवी गती मिळणार असल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 आमदार काशिनाथ दाते सर यांच्या नेतृत्वामुळे जामगावच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळत आहे. अल्पावधीतच कोट्यवधींच्या निधीतून रस्ते व पायाभूत सुविधा उभारून त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. दाते सर हे केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष काम करून दाखवणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या माध्यमातून गावागावांत विकासाची नवी दिशा निर्माण होत असून नागरिकांमध्ये विश्वास व समाधान निर्माण झाले आहे. आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास वाटतो.
– सुभाष दुधाडे (भाजपा जिल्हा सरचिटणीस)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments