Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरवासुंदे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सूर्यभान भालेकर, व्हाइस चेअरमनपदी लक्ष्मण झावरे यांची बिनविरोध...

वासुंदे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सूर्यभान भालेकर, व्हाइस चेअरमनपदी लक्ष्मण झावरे यांची बिनविरोध निवड; सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार



पारनेर/प्रतिनिधी : 
वासुंदे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सूर्यभान श्रीपदी भालेकर आणि व्हा. चेअरमनपदी लक्ष्मण मारुती झावरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सत्कार केला यावेळी गावातील मान्यवर, सोसायटी संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
या प्रसंगी उपस्थितांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. नवनिर्वाचित चेअरमन सूर्यभान भालेकर यांनी आपल्या मनोगतात सोसायटीच्या विकासासाठी सर्वांशी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर लक्ष्मण झावरे यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरून सोसायटीला नव्या उंचीवर नेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, सोसायटीचे संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सुजित झावरे पाटील यांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे. सोसायटीच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments