Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेरमध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी

पारनेरमध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी


पारनेर / प्रतिनिधी, 
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पारनेर भाजप कार्यालयात विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याच्या जडणघडणीत विखे पाटील यांच्या मोलाच्या योगदानाची उजळणी करण्यात आली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीला नवे परिमाण देत ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम केले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव दुधाडे, उपाध्यक्ष अर्जुन नवले, खरेदी-विक्री संचालक प्रमोद कावरे, रमेश गाडगे, ओंकार सालके, भिमाजी खणकर, विजय नवले, योगेश खणकर, सौरभ चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या सहकार, शिक्षण आणि सामाजिक समर्पणाच्या मूल्यांना आत्मसात करून समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता विखे पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करून झाली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments