Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर तालुक्यातील गाजदीपुर गावाला अद्याप रस्त्याची प्रतीक्षा; शिवाजी रोकडे यांचा उपोषणाचा इशारा

पारनेर तालुक्यातील गाजदीपुर गावाला अद्याप रस्त्याची प्रतीक्षा; शिवाजी रोकडे यांचा उपोषणाचा इशारा


पारनेर / प्रतिनिधी, 
स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गाजदीपुर या दुर्गम गावाला अद्यापही पक्का रस्ता नाही. गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना, विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखलमय मार्गावरून प्रवास करणे हे मोठे आव्हान ठरते, तर उन्हाळ्यातही वन्यप्राण्यांचा धोका कायम आहे.


सध्या गावाकडे जाणारा जुना रस्ता हा जंगलातून जात असून, नवीन रस्ता बांधण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळाली आहे. मात्र, निधीअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि रस्त्यासाठी निधी मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्ते शिवाजी रोकडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गाजदीपुर परिसराची पाहणी करून रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली. येत्या १३ ऑगस्टपासून ते पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष संपर्क करून रस्त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

“गाजदीपुरसारख्या दुर्गम गावाचा विकास करायचा असेल, तर रस्ता हा मूलभूत गरज आहे. यासाठी सर्वांनी पक्षनिरपेक्षपणे एकत्र येऊन मदत करावी,” असे आवाहन शिवाजी रोकडे यांनी केले आहे. ग्रामस्थांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments