पारनेर / प्रतिनिधी, 

मौजे माळकुप येथील कृषिनाथ ग्रीन एनर्जी (सोपानराव बाळकृष्ण ढसाळ) कारखाण्याचे दुषित पाणी स्थानिक शेतक-यांच्या विहिरीमध्ये उतरून सतत तीन वर्षापासुन झालेले नुकसान व स्थानिक मुलांना कामावर प्राधान्य देण्यात यावे व न्याय मिळावा यासाठी पुकारण्यात आलेले सरपंच संजय शंकर काळे व समस्थ ग्रामस्थ माळकुप यांचे आंदोलन पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथजी दाते सर यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले.

सरपंच संजय काळे यांनी सांगितले की कारखाना चालु झाल्यापासुन अॅसिडयुक्त घाण पाणी शेतक-यांच्या विहीरीमध्ये उतरून सर्व जमीन नापिक झाली, तसेच या कारखान्यामध्ये स्थानिक युवकांना नोकऱ्या देखील मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले गावातील सर्व तरून मुलांना कामावर घेण्यात यावे व पगार बाकीच्यांच्या प्रमाणे द्यावे. ज्या शेतक-यांच्या शेती कारखान्यालगत आहे त्यांची नुकसान झाली आहे त्यांना प्राधान्य देऊन त्यांना टेंडर द्यावे. शेतक-यांच्या विहीरीमध्ये खराब पाणी उतरले आहे त्याची चौकशी करून अहवाल मिळावा.

   सर्व स्थानिक शेतक-यांच्या सहया न घेता कारखान्याला प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी परवानगी दिली ती रद्द करण्यात यावी. कारखान्याच्या दुषीत पाण्याची विल्हेवाट लावणे. अशा विविध मागण्या घेऊन सरपंच संजय काळे यांनी ग्रामस्थ कारखान्यावर आंदोलन सुरू केले होते त्यानंतर कारखाना कमिटी व ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा होऊन पंधरा दिवसाच्या आत कमिटी व ग्रामस्थ यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करून ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे कारखाना कमिटी यांच्याकडून सांगण्यात आले.
आमदार दाते यांच्या मध्यस्थीनंतर कारखाना समितीने पुढील १५ दिवसांत ग्रामस्थांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.


आंदोलनात सरपंच संजय काळे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, जयसिंग नाबगे, लहू गांगुर्डे, सुदाम शिंदे, चेअरमन शरद नाबगे, रविराज खोडदे, मधुकर शिंदे, सदाशिव शिंदे, सुखदेव नाबगे, गणेश साठे, अतुल पवार, प्रणव राहिंज, आदेश काळे, वैभव शिंदे, कोंडिभाऊ सुनिल काळे, शिवाजी काळे, संदीप काळे, आकाश ठानगे, पोपट खांडके यांच्यासह माळकुप येथील महिला आणि ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *