पळवे खुर्द मध्ये ५० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ;

पारनेर | ता. प्रतिनिधी

कुठल्याही गावाचा विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, पळवे खुर्द गावाच्या मंजूर झालेल्या तब्बल ५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांचे शुभहस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यामध्ये तांदळेश्वर मंदिर देवस्थान परिसरात १५ लाख रुपये खर्चून सभामंडप बांधणे, पांगारमळा (गावठाण) ओढ्याला १५ लाख रुपये खर्चून बंधारा बांधणे, पाचारणेवस्ती परिसरात १० लाख रुपये खर्चून पथदिवे बसविणे आणि १० लाख रुपये खर्चून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे अशा महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर यांनी गावाच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन कामे मार्गी लावणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. गावातील मंदिर परिसर, पाणी साठवण, पथदिवे आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास झाल्यास त्याचा थेट लाभ ग्रामस्थांना होतो. त्यामुळे विकासकामांच्या नियोजनात गावाच्या प्रत्यक्ष गरजांना महत्त्व दिले जात आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, ग्रामस्थांनीही विकासकामांच्या बाबतीत सहकार्य करावे, असे आवाहन आ‌. दातेंनी केले. विकासकामांसाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह शासनातील संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी यांचे त्यांनी आभार मानले.

मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज, सामाजिक सभागृहे, धार्मिक स्थळांचा विकास आणि अन्य मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. विकासकामे मंजूर करून घेण्याबरोबरच ती प्रत्यक्षात पूर्णत्वास नेण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. जनतेने दाखविलेला विश्वास आणि ग्रामस्थांनी मांडलेल्या अपेक्षा यांना न्याय देण्याची आपली जबाबदारी असून, पळवे खुर्द गावाच्या उर्वरित विकासकामांसाठीही भविष्यात आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, भाजपाचे मंडलाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, उद्योजक दिलीप शेठ दाते, पारनेर दूध संघाचे माजी चेअरमन दत्ता नाना पवार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सुषमाताई रावडे, PSI नानाभाऊ मापारी, सरपंच लहु भालेकर, सोनाली कुलथे, डॉ. विलास काळे, ॲड. युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पळवे गावातील शशिकांत देशमुख, विजयकुमार बन्सी जगताप, नानाभाऊ गाडीलकर, वसंत देशमुख, अंबादास तरटे, अमोल शेळके, रोहिदास नवले, प्रफुल्ल शेळके, सचिन शेळके, भीमा शेळके, शांताराम पाचारणे, शिवाजी जगताप, चंद्रकांत बारगळ, ईशांत तरटे, विक्रांत देशमुख, राजेश देशमुख, भाग्येश देशमुख, आबासाहेब इरकर, राजेंद्र पाचरणे, रामानंद स्वामी, पोपट पाचारणे, नितीन गुंड, दत्तात्रय जगताप, सुदाम जगताप, संदीप जगताप, संपतराव जगताप, मारुती जगताप, शंकर काळे, संतोष पखाले, झुंगदेव जगताप, कृष्णा शेलार, संभाजी बर्डे, तानाजी रोहकले, बाळासाहेब शेळके सर, विठ्ठल पोटघन, राजेंद्र जाधव, सुरेश कळमकर, संदीप गाडीलकर, मच्छिंद्र कुटे, शिवाजी पाचरणे, किसन पाचारणे यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *