पारनेर / प्रतिनिधी,

अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पारनेर तालुक्यातील ढोकी येथील उद्योजक तथा युवा नेते सकलेन पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते टाकळी ढोकेश्वर येथे मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सकलेन पठाण यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, सकलेन पठाण यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल. तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थित मान्यवरांनी सकलेन पठाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, पळशीचे सरपंच प्रकाश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, अमोल उगले, निवेदक गणेश पाडेकर, रवींद्र गायखे यांच्यासह मित्रपरिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *