खडकवाडी येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न.
पारनेर / भगवान गायकवाड,
गोरगरिब जनतेची सेवा करणे हेच खरे ईश्वर सेवेचे माध्यम आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन दीपक लंके यांनी केले. ते पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. खडकवाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रोकडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आपल्या दिवंगत मातोश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ या भव्य मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते.दीपक लंके यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना दिपक लंके यांनी, हल्ली वाढदिवस साजरा करणे ही एक फॅशन झाली आहे, मात्र राजेंद्र रोकडे यांनी समाजातील विविध आजारांनी पीडित लोकांसाठी शिबिराचे आयोजन करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार काढले. तरुणांनी त्यांच्या या विधायक कार्याचे अनुकरण केल्यास आदर्श तरुणांची पिढी घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या शिबिरात परिसरातील सुमारे ३७० रुग्णांनी विविध प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेतला. स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स रिसर्च सेंटर, अहिल्यानगर आणि मातोश्री हॉस्पीटल आणे यांच्या वतीने शिबिरात बांधकाम कामगारांची मोफत रक्त आणि आरोग्य तपासणी फिजिओथेरपी व मणक्यांच्या आजारांवर उपचार,संगणकीय नेत्ररोग तपासणी आणि मोफत चष्मे वाटप,मसाज करणे या कार्यक्रमाला लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल उगले, मोहनराव रोकडे, प्रकाश गाजरे, सुभाष ढोकळे गुरुजी, डॉ. रावसाहेब आग्रे, श्रीरंग रोकडे, भास्कर रोकडे, मारूती आग्रे गुरुजी, प्रकाशशेठ शेवंते, विष्णूशेठ शिंदे, विठ्ठल शिंदे, संतोष शिंदे, बाबामहाराज खामकर, जालिंदर आहेर सर, ज्ञानदेव औटि सर, बबन भाऊ ढोकळे, आबा नवले गुरुजी, अण्णासाहेब गागरे, धोंडीभाऊ शिंगोटे, अनिल गागरे, शंकरराव नवले, कोंडीभाऊ गागरे, विश्वनाथ ढोकळे, बाबासाहेब साळुंखे, बाबू नवले, प्रदीप ढोकळे, सागर रोकडे, बन्सी ढोकळे, राजू ढोकळे, बाबासाहेब यादव गागरे, अनिल गागरे, विशाल गागरे, गणेश आग्रे, अण्णासाहेब शिंदे, संतोष ढोकळे, संतोष धोत्रे, संतोष बर्डे, संजय इघे, बाळासाहेब कुटे, रामनाथ इघे, भास्कर बर्डे, बाबुराव हुलावळे, संपतराव रोकडे, निवृत्ती वाकचौरे, रघुनाथ ढोकळे, बाबासाहेब दगडू गागरे, बबन गागरे, मच्छिंद्र शेवंते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र मधुकर रोकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याबद्दल समाजाच्या सर्व थरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष ढोकळे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब शिंगोटे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. आयोजक राजेंद्र रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




