Friday, November 27, 2026
Google search engine
Homeभगवान गायकवाडचैत्यभूमीवर श्रामनेर प्रशिक्षणार्थींना फलाहार वाटप; पारनेरमधील सामाजिक संघटनांचा स्तुत्य उपक्रम

चैत्यभूमीवर श्रामनेर प्रशिक्षणार्थींना फलाहार वाटप; पारनेरमधील सामाजिक संघटनांचा स्तुत्य उपक्रम


पारनेर / भगवान गायकवाड, 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण स्थान असलेल्या दादर येथील चैत्यभूमी परिसरात सध्या राज्यस्तरीय बौद्ध श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील श्रामनेरांना पाठबळ देण्यासाठी आणि सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज, पारनेर’ आणि ‘पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फलाहार वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.पारनेर तालुक्यातील समाजबांधवांनी एकत्र येत मुंबईत राबवलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. चैत्यभूमी ही केवळ एक स्मारकाची जागा नसून ती लाखो अनुयायांसाठी ऊर्जास्त्रोत आहे. याच ठिकाणी धम्म प्रशिक्षणाचे धडे घेणाऱ्या ५० श्रामनेरांना या उपक्रमांतर्गत सकस फलाहार देण्यात आला.

या प्रसंगी शिवकांत शिंदे (अध्यक्ष, पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघ, मुंबई.शरद नगरे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज, सुरेश रोकडे सामाजिक कार्यकर्ते ,सुरेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, भगवान गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, स्नेहालय संस्था संचलित ‘उडान’ प्रकल्प शिक्षतेकर संघटना माध्यमिक पारनेर तालुकाध्यक्ष महेंद्र बोर्डे व सौ. शिंदे ताई आदी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी बोलताना शिवकांत शिंदे यांनी नमूद केले की, “आपल्या मातीतील माणसे जेव्हा मुंबईसारख्या महानगरात एकत्र येतात आणि सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतात, तेव्हा समाजाची नाळ घट्ट होण्यास मदत होते.” तसेच शरद नगरे यांनी सांगितले की, श्रामनेर प्रशिक्षणातून येणारी पिढी धम्माचे आणि समतेचे संस्कार घेऊन बाहेर पडणार आहे, त्यांना अल्पसा हातभार लावणे हे आमचे कर्तव्य आहे.
स्नेहालय संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाचे भगवान गायकवाड यांनीही यावेळी आपले विचार मांडले. पारनेर तालुक्यातील संघटनांनी दाखवलेली ही तत्परता आणि सेवाभाव इतर सामाजिक संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील संघटना आणि मुंबईतील नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले बांधव यांनी एकत्र येऊन राबवलेल्या या फलाहार वाटप कार्यक्रमामुळे चैत्यभूमी परिसरातील वातावरण अधिकच चैतन्यमय झाले होते. शिबिरातील प्रशिक्षणार्थींनीही या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments