Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेर“समतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; निघोजमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात”

“समतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प; निघोजमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात”



पारनेर | ता. प्रतिनिधी,  
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निघोज येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले की, “महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश देत परिवर्तनाची क्रांती घडवून आणली. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि समाजात समानतेची भावना रुजवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

ते पुढे म्हणाले, “आजच्या आधुनिक युगातही महात्मा फुले यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहावे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.”

तसेच उपस्थित युवकांना उद्देशून त्यांनी सांगितले की, “महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सामाजिक ऐक्य वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

या कार्यक्रमास मळगंगा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठलराव कवाद, रमेशशेठ वरखडे, रोहिदासशेठ लामखडे, डीवायएसपी सुभाषजी सोनवणे, पीएसआय दिलीपजी सोनवणे, समता परिषदेचे अध्यक्ष पृथ्वीदादा कोल्हे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन हिराभाऊ सोनवणे, मातंग समाज चळवळीचे सतीशजी साळवे, सुलतानभाई सय्यद, प्रवीण व्यवहारे, राहुल वाघमारे, राजुशेठ कुदळे, विनायक सोनवणे, शांताराम सोनवणे, दामूशेठ लंके, निलेश रसाळ, अनिल मदगे, अजय सोनवणे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या विचारांवर चालत समाजप्रगतीचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments