Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरढोकेश्वर महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न; सिताराम खिलारी यांनी केले...

ढोकेश्वर महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न; सिताराम खिलारी यांनी केले मार्गदर्शन


टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालया मध्ये माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी होते.

प्रमुख पाहूणे म्हणून हभप बाबा महराज शिंदे हभप प्रसाद महाराज खिलारी गमविस्तार अधिकारी संपत दातीर श्रावण गायकवाड बाबा साहेब मंचरे विलास ठुबे प्राथमिक शिक्षिका संध्या घोलप यांच्या सह पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

सिताराम खिलारी यावेळी बोलताना म्हणाले की पालक आणि माजी विद्यार्थी यांच्या सहयोगा तुन महाविद्यालयाची प्रगती सहज होईल ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना या महाविद्यालयाने ज्ञानाचे भांडार खुले करून दिले 
बाबासाहेब शिंदे यावेळी म्हणाले की या महाविद्यालयाने आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला सामाजिक काम करण्याचे बाळकडू मिळालं 
प्राचार्य लक्ष्मण मतकर यांनी पालक आणि विद्यार्थी सहयोगातुन महाविद्यालयाची प्रगती साधता आली या साठी आपणा सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविकात प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा देऊन माजी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्रगती मध्ये मोठे योगदान आहे कार्यक्रमाच सुत्र संचालन प्रा. डॉ. जिजाभाऊ घुले यांनी केले तर आभार उपप्राचार्च विरेंद्र धनशेट्टी यांनी मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments