पारनेर / भगवान गायकवाड,
गेल्या २३ तारखेला पवारवाडी येथील एका दुकानावर चोर आल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी या चोरांचा पाठलाग केला. या तीन पैकी दोन चोर पसार होण्यास यशस्वी झाले. एका चोरास नागरिकांनी पकडले आणि चोप दिला आणि काही नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर त्या चोरास पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरास पोलिस ठाण्यात आणल्यानंतर चार तासाने या चोराचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात नागरिकांचा कुठल्याच प्रकारचा सहभाग नसल्याचे आणि त्या नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी सुपा ग्रामपंचायतचे सरपंच मनिषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन सुपा बंदची हाक दिली होती. सुपा ग्रामपंच्याच्या या आवाहनास प्रतिसाद देत सुपा गाव दिवसभर कडकडीत बंद होते.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुपा गावात सदर व्यक्तीने चोरी केली म्हणून दिनांक २३/७/२०२५ रोजी रोजी अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ११२ वर फोन करून कळविले .त्यानंतर सदर चोरी करणारे व्यक्तीस सुपा टोल नाक्यावर काही इसमानी पकडले. व सुपा टोल नाकाच्या केबिनमध्ये त्याच पकडून ठेवले .काही वेळातच पोलीस गाडी सुपा टोल नाक्यावर पोहोचली .चोरी करणारे व्यक्तीना. सोबत पोलीस गाडीत घेऊन गेले. सदर चोरी करणारी व्यक्ती टोलनाक्यापासून पोलीस गाडी पर्यंत पोलिसांसोबत स्वतः चालत जाऊन गाडीत बसला. सदर चोर व्यक्तीस कुठल्याही प्रकारची जखम होऊन रक्ता निघाल्याचे दिसून आले नाही. सदर चोरास पोलिसांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सीसीटीव्ही कॅमेरा समोर बसवल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे .सदर चोराचा चार तासानंतर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला आहे. तरी सदर चोराच्या मृत्यूस सुपा गावातील टोल नाक्यावर हजर असलेली कुठलीही व्यक्ती जबाबदार नाही. तरी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की सुपा टोल नाक्यावर जर हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवू नये तसेच निपक्ष व स्वतंत्र चौकशी व्हावी सदरचा ठराव दि.२९/७/२०२५ रोजी विशेष ग्रामसभा बाजारतळ सुपा येथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी एकमताने ठराव मंजूर केलेला आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, सी आय डी,डी वाय एस पी अहिल्यानगर ग्रामीण, एल. जी. नाशिक, पोलिस निरीक्षक सुपा पोलिस स्टेशन, यांना देण्यात आले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
चोराला पकडून देणाऱ्या युवकांची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नाहीत. त्यांचा हेतू त्या व्यक्तीला मारहाण करण्याचा नसून त्या चोराला पकडून पोलिसांना स्वाधिन करुन सहकार्य करण्याचा होता. परंतु त्या चोराचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या चोराला पकडुन देणाऱ्या युवकांवरती गुन्हे दाखल होतील अशी भीती ग्रामस्थांमध्ये असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुपा ग्रामपंचायतच्या सरपंच मनिषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन सुपा बंदची हाक दिली होती. त्यामुळे सूपा ग्रामपंचायतच्या या आवाहनास प्रतिसाद देत सुपा गाव दिवसभर कडकडीत बंद होते.
– योगेश रोकडे, ग्रामस्थ





