Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर नगरपंचायतचे "स्वच्छ सर्वेक्षण 2024" मध्ये उल्लेखनीय यश; जिल्ह्यात प्रथम क्रमांक

पारनेर नगरपंचायतचे “स्वच्छ सर्वेक्षण 2024” मध्ये उल्लेखनीय यश; जिल्ह्यात प्रथम क्रमांक


पारनेर / भगवान गायकवाड, 
‘स्वच्छ भारत अभियान 2.0’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा संपूर्ण देशात घेण्यात आली होती. या स्पर्धेमधे पारनेर नगरपंचायतीने सहभाग नोंदविला होता. २०२४ या वर्षात GFC (कचरा मुक्त शहर), ODF ++ (हगणदारी मुक्त शहर) व स्वच्छ सर्वेक्षण रँकिंग इत्यादी घटक सदर स्पर्धेत मानांकित केले जातात, तसेच वरील घटकांसाठी एकूण 12500 गुण असतात.

याची पूर्वतयारी म्हणून सन २०२४ च्या वर्षात संपूर्ण शहरातील कचराकुंडी मुक्त शहर, सार्वजनिक शौचालय साफसफाई, विविध ठिकाणी हगणदारीमुक्त ठिकाणे, शहरातील कचरा संकलन, त्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट निर्मिती, पुनर्वापराचे प्रोत्साहन, स्वच्छता व्यवस्थापनाचे डिजिटायझेशन या सर्व बाबी पार पाडल्या गेल्या.तसेच वृक्षारोपण आणि नागरिकांमध्ये जनजागृती करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या. याचाच परिणाम म्हणून पारनेर नगरपंचायतीने (लोकसंख्या 5000-20,000 या गटातून) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच राज्यात १५ वा क्रमांक मिळवत स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले.

तसेच सदर स्पर्धेत देशातील मोठी शहरे सहभागी झाली असूनही पारनेर नगरपंचायतीने इतिहास घडविला आहे. शासनाच्या GFC रँकिंगमध्ये ‘वन स्टार’ रँकिंग पारनेर नगरपंचायतीस प्राप्त झाला आहे व ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा सुद्धा कायम ठेवण्यात आला आहे. एकूण 12500 पैकी 9267 गुण प्राप्त झाले आहेत. त्यानुसार देशभरातील 2030 शहरांमधून पारनेर नगरपंचायतीस 154 वा क्रमांक मिळाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी एप्रिल व मे 2025 या कालावधीत शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत फील्ड असेसमेंट करण्यात आले. त्यावेळी पारनेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. विनय शिपाई, नगराध्यक्ष श्री. नितीन अडसूळ,उपनगराध्यक्ष जायदा शेख,स्वच्छता व आरोग्य समिती सभापती सौ. प्रियांका सचिन औटी तसेच नगरपंचायत चे सर्व सभापती व सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता श्री. शंकर गोरे, शहर समन्वयक श्री. मारुती ठोंबरे, सौ. सुप्रिया गायकवाड, आरोग्य सेवक दत्तात्रय श्रीमंदिलकर व सर्व सफाई कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर नगरपंचायतने या स्पर्धेमध्ये भाग घेऊन सर्व नगरसेवक तसेच तत्कालीन मुख्याधिकारी साहेब व कर्मचारी यांचे सहकार्याने चांगली कामगिरी केली असून भविष्यात देखील पारनेर नगरपंचायत या स्पर्धेत भाग घेऊन नागरीकांच्या सहकार्याने अव्वल क्रमांकासाठी प्रयत्नशील राहील.
   –  नगराध्यक्ष श्री. नितीन रमेश अडसूळ, आरोग्य सभापती सौ.प्रियांका सचिन औटी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments