Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरदिव्यांग दिनानिमित्त भांडगाव जि. प. शाळेत दिव्यांग व्यक्तींचा सत्कार!

दिव्यांग दिनानिमित्त भांडगाव जि. प. शाळेत दिव्यांग व्यक्तींचा सत्कार!


पारनेर / भगवान गायकवाड, 
      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भांडगाव येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय उमेश खरमाळे हे होते. समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या असामान्य योगदानाचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.शाळेतील शिक्षक बाळासाहेब सालके यांनी दिव्यांग व्यक्तींनी विविध क्षेत्रात केलेल्या सर्वोच्च कामगिरीचे वर्णन करून उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांच्या भाषणातून दिव्यांग व्यक्तींच्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या विशेष दिनानिमित्त, शिवतेज प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आधार दिव्यांग ट्रस्ट, ढवळपुरीचे अध्यक्ष नितीन बबनराव खरमाळे, तसेच राजू गोविंद पवार आणि दत्ता बबन भुजबळ या कर्तृत्ववान दिव्यांग व्यक्तींचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना शाळेने समाजापुढे एक आदर्श ठेवला.सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर खरमाळे, उपाध्यक्षा सविता भुजबळ, माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष गणेश खरमाळे, उपाध्यक्ष गणेश शेलार, संगीता जाधव, सुनिता कुटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब खरमाळे यांनी प्रभावीपणे केले, तर शाळेचे मुख्याध्यापक अप्पासाहेब नरवडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments