Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरधनंजय निमसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती

धनंजय निमसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती



आ. दातेंच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पारनेर / ता. प्रतिनिधी,  

गुरुवार दि. २२ आक्टो. २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत गोवर्धन उर्फ धनंजय निमसे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाहतूक सेलच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते आ. काशिनाथ दाते व आ. शिवाजीराव गर्जे यांचे उपस्थित निमसे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

गोवर्धन निमसे यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविण्यात आल्याने वाहतूक क्षेत्रातील संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वाहतूक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बांधणी, त्यांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि पक्षाचे कार्य राज्यभर अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

या नियुक्तीप्रसंगी आमदार दाते सर यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याला बळ देतानाच पक्षाच्या राज्यस्तरीय वाटचालीत योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका त्यांच्या उपस्थितीतून अधोरेखित झाली. पक्षातील कार्यकर्त्यांना संधी, नेतृत्वाला प्रोत्साहन आणि संघटनात्मक बांधणीला चालना देण्याच्या दृष्टीने या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

यावेळी विधानपरिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे साहेब, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांतदादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतदादा चेडे, संजयशेठ आहेर, संतोषशेठ चौगुले, अविनाशशेठ गोडसे आणि आदित्यशेठ नरड उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा, जनसेवेची परंपरा आणि सर्वसामान्यांशी असलेली बांधिलकी पुढे नेण्याच्या उद्देशाने संघटनात्मक काम अधिक व्यापक करण्यावर पक्षाचा भर आहे. गोवर्धनशेठ निमसे यांच्या नियुक्तीमुळे वाहतूक सेलच्या कार्याला राज्यभर नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोवर्धनशेठ निमसे यांचे राज्यप्रमुखपदी नियुक्तीबद्दल अभिनंदन करून आमदार काशिनाथ दाते सरांसह उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ धनंजय निमसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाहतूक सेलच्या राज्यप्रमुखपदी झालेली नियुक्ती ही पारनेर तालुक्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. पारनेर तालुक्याला प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय पातळीवर राज्यस्तरावर काम करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे, ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळेल आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल. धनंजय निमसे आपल्या अनुभवातून आणि कार्यक्षमतेतून या जबाबदारीला निश्चितच न्याय देतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!

– आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य, पारनेर – नगर)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments