Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर पोलिसांची कारवाई; विहिरीवरील मोटारीच्या केबल चोरणारा आरोपी अटकेत

पारनेर पोलिसांची कारवाई; विहिरीवरील मोटारीच्या केबल चोरणारा आरोपी अटकेत


८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; तीन गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा

पारनेर / प्रतिनिधी, 
पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारींच्या केबल चोरी करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय सिताराम काळे (वय २५, रा. दरडगाव थडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे कॉपर केबलचे तुकडे आणि मोटारसायकल असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भाळवणी येथील पोपट उर्फ विजय मुरलीधर पवार (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या विहिरीवरील मोटारीची केबल तसेच इतर शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यातून आरोपी अक्षय काळे याला वडगाव सावताळ परिसरातून ताब्यात घेऊन १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.

न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान त्याने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार अनिल देवकर करीत आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments