पारनेर / प्रतिनिधी,
भारतीय जनता पार्टी, पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ‘SIR’ (मतदार यादी शुद्धीकरण) मोहिमेअंतर्गत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. ७ जून २०२६) पारनेर येथील भाजप कार्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा. श्री. सुनीलजी राणे आणि भाजप अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिलीपराव भालसिंग यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला संबोधित करताना मान्यवरांनी सांगितले की, “लोकशाहीमध्ये मतदार यादी ही अत्यंत महत्त्वाची असते. मतदारांची नोंदणी अचूक असणे आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करणे ही काळाची गरज आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळापर्यंत पोहोचून मतदारांच्या नोंदी तपासणे आणि त्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
मतदार यादीतील नावे शोधणे, वगळलेली नावे समाविष्ट करणे, पत्ता बदलणे व इतर तांत्रिक बाबींवर या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्ते श्री.दीपक इंगळे यांना भाजपच्या सांस्कृतिक सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी तर श्री.अतुल माने यांना भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हा चिटणीस पदाची नियुक्ती पत्र देण्यात आली.
या प्रसंगी भाजप राज्य परिषद सदस्य मा. श्री. विश्वनाथ दादा कोरडे, जिल्हा सरचिटणीस मा. श्री. सुभाषराव दुधाडे, भाजप मंडल अध्यक्ष मा. श्री. राहुल शिंदे पाटील, मा. श्री. शिवाजी काका खिलारी, मा. श्री. सचिन वराळ पाटील, दत्तानाना पवार यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



