Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेर राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदी संतोष सालके यांची निवड ; आमदार काशिनाथ दातेंकडून...

पारनेर राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदी संतोष सालके यांची निवड ; आमदार काशिनाथ दातेंकडून सालकेंचा सत्कार


पारनेर : भगवान गायकवाड, 

पारनेर तालुक्यातील जवळा गावचे संतोष बाबाजी सालके यांची पारनेर राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदी करण्यात आलेली निवड हि अतिशय योग्य असून त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील पक्षसंघटना वाढीसाठी मदत होणार असल्याचे मत पारनेर-नगर विधानसभा सदस्य काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे.
सालके यांच्या निवडीचे जवळा परिसरासह संपूर्ण तालुक्यातून स्वागत होत असून त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांचे पुरोगामी विचार व पक्षाची ध्येयधोरणे समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करून संघटना मजबूत करण्यासाठी ते निच्छितच प्रयत्न करतील असा आपणास विश्वास असल्याचेही आमदार काशिनाथ दाते यांनी म्हटले आहे. 

पुढे बोलताना आ. दाते यांनी सांगितले कि, पुढील काळात तालुक्यात पक्ष बांधणीच्या दृष्टीने सर्व सहकार्यांना विश्वासात घेवून ठोस पाऊले टाकण्यात येतील. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्राथमिक सदस्यापासून तर अगदी तालुकाध्यक्षापर्यंत सर्वांनी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या ह्या निवडीबाबत आमदार काशिनाथ दाते यांनी सालके यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments