Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पारनेर येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात वृक्षारोपण

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पारनेर येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात वृक्षारोपण


पारनेर, दि. ३१ (प्रतिनिधी): पारनेर तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पारनेर येथील लघु पशु वैद्यकीय चिकित्सालयाच्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध फळझाडांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमात प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ.विष्णू नांदे यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपणाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अरविंद रेपाळे यांनी वृक्षलागवडीद्वारे पर्यावरण संतुलन राखण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. नितीन गाडीलकर, डॉ. स्नेहलता गवारे, महाराष्ट्र राज्य पत्रकार सांघाचे अहिल्यानगर डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष पत्रकार विनोद गायकवाड, पर्यावरण मित्र लतिफ राजे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, पत्रकार संतोष सोबले यांच्या शुभहस्ते फळझाडांचे रोपण करण्यात आले.

वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाबरोबरच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला आणि त्यांच्या सामाजिक योगदानाला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न होता. उपस्थितांनी वृक्ष संगोपनाचे महत्त्व जाणून त्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. हा कार्यक्रम पर्यावरण जागरूकतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल ठरला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments