Friday, November 27, 2026
Google search engine
Homeटाकळी ढोकेश्वरबांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आ. दातेंचा पुढाकार; १८६ कामगारांना सुरक्षा साहित्य किटचे वाटप

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आ. दातेंचा पुढाकार; १८६ कामगारांना सुरक्षा साहित्य किटचे वाटप


टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी,  
बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने तालुक्यातील १८६ बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार दाते सर यांनी उपस्थित बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच, गृहउपयोगी साहित्य संच, विवाह सहाय्य योजना, प्रसूती लाभ योजना, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, गंभीर आजार उपचार सहाय्य, अपंगत्व सहाय्य, नैसर्गिक मृत्यू व अपघाती मृत्यू सहाय्य, वृद्धापकाळ पेन्शन, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच घरकुलासाठी विविध स्वरूपाचे लाभ उपलब्ध करून दिले जात आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी अधिकृत नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मतदारसंघातील बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार तसेच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार.


या कार्यक्रमास तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा जयश्री शिंदे यांसह प्रियंका शिंदे, शितल पोटे, रांधवण सर, शिवनाथ राऊत गोपिनाथ राऊत, विद्या शिंदे, कमलेश जाधव, ओंकार शिंदे, सुनिता पवार, राधा गगे, सुनिता ताई जाधव तसेच बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “बांधकाम कामगार हे विकासाच्या प्रत्येक कामाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, कोणताही पात्र कामगार योजनांपासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.” बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा माझा मानस आहे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता गट, अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही विशेष अभिनंदन केले. 

– आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments