Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरलोणी हवेली पारनेर रस्त्याचे काम संथगतीने, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

लोणी हवेली पारनेर रस्त्याचे काम संथगतीने, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा



पारनेर / भगवान गायकवाड, 

        लोणी हवेली ते पारनेर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत तीन दिवसांत या रस्ता कामात सुधारणा न झाल्यास पारनेर आंबेडकर चौकात रास्ता रोको व उपोषण करण्यात येईल यादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

         या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर, तहसीलदार कार्यालय पारनेर, खासदार कार्यालय पारनेर, आमदार कार्यालय पारनेर, पंचायत समिती कार्यालय पारनेर, पोलिस स्टेशन पारनेर या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे.

        निवेदनात म्हटले आहे की, लोणी हवेली ते पारनेर रस्त्याचे काम हे अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. एसटी बस बंद असल्याने ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना प्रवास करण्यास अडथळा निर्माण होत आहे यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे आतोनात हाल होत आहेत. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. यादरम्यान अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे व १० ते १५ जण जखमी झाले आहेत. यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये असा प्रश्न उपस्थित करून तीन दिवसात कामाची गती वाढवावी व रस्त्याच्या साईपट्ट्यावर मुरूम टाकण्यात यावा. या कामाची त्वरित कार्यवाही न झाल्यास शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी पारनेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
        यावेळी सरपंच सौ. जान्हवी बाजीराव दुधाडे, उपसरपंच अमोल विक्रम दुधाडे, मा. सरपंच लहू अण्णा कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पंढरीनाथ थोरे, सदस्य शत्रुघ्न बाबूराव नवघणे, सदस्य दादाभाऊ जिजाबापू दुधाडे, ग्रामरोजगार सहाय्यक संघटना अध्यक्ष बाजीराव दुधाडे, शिवसेना गट प्रमुख संभाजी बाबूराव थोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जाधव, प्रगतशील शेतकरी बबनराव ढाकणे, सामजिक कार्यकर्ते सुभाष कोल्हे, सामजिक कार्यकर्ते युवराज कोल्हे, सामजिक कार्यकर्ते युवराज जगताप, सामजिक कार्यकर्ते सागर हिंगडे आदी यावेळी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments