कामोठेत पारनेरकरांचा दहीहंडी महोत्सव उत्साहात पार

पारनेर / भगवान गायकवाड,
नवी मुंबईच्या कामोठे शहरात पारनेर तालुका रहिवासी संघ (मुंबई स्थित) व पठार भागातील रहिवाशांच्या सहकार्याने आयोजित केलेला दहीहंडी महोत्सव दिमाखदार जल्लोषात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याला पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. काशिनाथ दाते सर विशेष उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर उत्साहात न्हाऊन निघाला.

मुंबई, पुणे, ठाणे, मिरा-भाईंदर, कोकण अशा विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथके या महोत्सवासाठी दाखल झाली होती. मुसळधार पावसातही हजारो-लाखो भाविकांनी उपस्थित राहून “गोविंदा आला रे आला”च्या गजरात वातावरण दणाणून टाकले.

सोहळ्याची सुरुवात दहीहंडी पूजनाने व भक्तिगीत कार्यक्रमाने झाली. महिलांसाठी खास सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. दुपारी झालेल्या थर लावण्याच्या स्पर्धेत जय श्रीराम गोविंदा पथक (कळंबोली) यांनी सात थर लावून प्रथम क्रमांक पटकावला. शिवप्रेरणा गोविंदा पथक (कळंबोली) यांनी द्वितीय, तर आई-बाबा गोविंदा पथक (कामोठे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
आमदार काशिनाथ दाते यांनी या भव्य आयोजनाचे कौतुक करताना सांगितले की, “दहीहंडी हा केवळ धार्मिकता वा परंपरा जपण्याचा उत्सव नसून तो श्रीकृष्णाने दाखविलेल्या एकतेचा, धैर्याचा आणि श्रमांच्या सन्मानाचे महापर्व आहे. जसे गोविंदा पथक एकत्र येऊन थर लावतात तसेच पारनेर तालुक्यातील मतदारांनीही एकदिलाने थर लावल्यानेच खऱ्या अर्थाने लोकशाहीची हंडी फोडली आहे. कामोठे स्थित पारनेरकरांनी विधानसभा निवडणुकीत बजावलेली भूमिका ही श्रीकृष्णाच्या संघटित शक्तीची जाणीव करून देणारी ठरली असुन समाज आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात ‘एकता हाच विजयाचा पाया’ हे दहीहंडी महोत्सवातून अधोरेखित झाले आहे.” राजकारण बाजूला ठेवून पुढील वर्षी पारनेरकरांची एकच दहीहंडी व्हावी अशी अपेक्षा आ. दाते यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, जी.एस. महानगर बॅकेंच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती गितांजलीताई उदयराव शेळके, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे ,पारनेर तालुक्याचे समाजभूषण अँड पांडुरंग गायकवाड साहेब, संदिप वराळ पाटील फाउंडेशन अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील, पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भास्करराव उचळे, भोसरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक पंढरीनाथशेठ उंडे, भाजपाचे शहराध्यक्ष विकासदादा घरत, हॅप्पी सिंग, राजकुमार पाटील, प्रदिप भगत, दिलिप पाटील,सुनिल शर्मा, अमोल शेठ सैद, दामोदर चव्हाण, दिलिप पाटील,अरूण जाधव साहेब, अँड. समाधान काशिद, डॉ. संतोष जाधव, डॉ. श्रीकांत तोडकर उपमुख्यमंत्री ओ.एस. डी. मंत्रालय, शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णाताई वाळुंज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण नियोजन पारनेर तालुका रहिवासी संघ (मुंबई) च्या समितीचे अध्यक्ष भाऊशेठ पावडे, कार्याध्यक्ष कुंडलिकशेठ वाफारे, उपाध्यक्ष दिलिपभाऊ घुले, सचिव कृष्णाशेठ ढोमे, खजिनदार सबाजी जराड, कार्यकारिणीचे सदस्य शिवाजीभाऊ सुपेकर, जनार्दन उंडे, गणेश गुंड, शुभम वाफारे, मनोज कवडे, उद्धव लांडगे, महादेवशेठ पुंडे, धनंजयशेठ निमसे, तुषार लांडगे,शेखर काशिद,संजय आहेर,महेश कवडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काटेकोरपणे पार पाडले.

कार्यक्रमाचं अप्रतिम सुत्रसंचलन कोरठण गडाचे विश्वस्त जालिंदर खोसे यांनी केले. अतिशय सुंदर नियोजन, भक्तिमय वातावरण, गोविंदांची धमाल आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कामोठे येथील हा दहीहंडी महोत्सव भाविकांच्या मनात कायमस्वरूपी कोरला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *