नांदूर पठार येथे मातोश्री शेतपाणंद रस्त्यांच्या १८ लाखांच्या तीन रस्ता कामांचा भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न
पारनेर/प्रतिनिधी :
खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. शेतपाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून नांदूर पठारमध्येही विकासाची गती कायम राहील. गावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अधिकाधिक विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार आहे, विकासाची वाट आता खेड्यापाड्यात पोहोचवायची आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक लंके यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथे लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या मातोश्री शेतपाणंद रस्त्यांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक लंके यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १९ जून २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या विकासकामांसाठी एकूण ५४ लाख रुपयांचा (प्रत्येकी १८ लाख रुपये) निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांमध्ये श्री मुक्ताबाई मंदिर ते गारमाळ रस्ता तयार करणे (निधी: १८ लक्ष), शिवाजीवाडी ते दर्या रस्ता तयार करणे (निधी: १८ लक्ष), बाळू पानसरे घर ते पानसरदरा तलाव रस्ता तयार करणे (निधी: १८ लक्ष) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमास टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या नेत्या सोनियाताई रवींद्र राजदेव, खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक संदीप चौधरी, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव उद्योजक दिनेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदूर पठार गावात शेतपाणंद रस्त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २६ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक, शेतीकामे आणि दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील विकासाला चालना देणाऱ्या या कामांमुळे गावाचा चेहरामोहराच बदलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासदार निलेश लंके यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि गावागावांत विकासकामे पोहोचविण्यासाठी अशा योजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी रवींद्र राजदेव, सोनिया राजदेव, संदीप चौधरी, यांच्यासह कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त चंद्रभान ठुबे, पोपट गुंड, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष दिनेश घोलप, शंकर चिकने, भानुदास आंग्रे, ॲड. सूर्यकांत वलवे, प्रकाश राजदेव, बाळासाहेब चौधरी, माधव आंग्रे, दत्तात्रय चौधरी, जयराम चौधरी, शिवप्रसाद दिवेकर, शशिकांत आंग्रे, रमेश घोलप, शंकर आंग्रे, बबन घोलप, राजाराम राजदेव, योगेश राजदेव, मुरलीधर राजदेव, बाळासाहेब भांबरे, निलेश शिंदे, रंगनाथ आहेर, रंगनाथ राजदेव, सुरेश राजदेव, सुदाम वलवे, बाळासाहेब घोलप, रवींद्र चौधरी, रोहिदास गायकवाड, गणेश राजदेव, तुळशीराम आंग्रे, रवींद्र घोलप, योगेश जाधव, कैलास राजदेव, मारुती आंग्रे, संदेश आंग्रे, गणेश देशमाने, भागाजी पानसरे, सुयोग चौधरी, दत्ता चौधरी, बाळासाहेब पानसरे, ताराबाई राजदेव, छाया पानसरे, भरती चौधरी, रोहिणी चौधरी, कचराबाई पानसरे, चंद्रभान राजदेव आणि बदामबाई राजदेव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶
नांदूर पठारच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. शेतपाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या अडचणी दूर होत आहेत. गावातील प्रत्येक वस्ती, शेतकरी आणि नागरिकांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून आगामी काळातही विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
— रवींद्र राजदेव
नेते, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट




