पानोली (प्रतिनिधी):
हिंदवी विचारधारा पानोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवछत्रपती चषक’ क्रिकेट स्पर्धा पानोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात पार पडली. तालुक्यातील विविध संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला होता. अंतिम सामन्यात आकाश चौधरी यांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध फलंदाजी-गोलंदाजी आणि प्रभावी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दिमाखदार विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.

संघाचा कर्णधार अमोल दुश्मन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. निर्णायक क्षणी संयम राखत खेळाडूंनी सामन्याची सूत्रे आपल्या हातात ठेवली. विजेत्या संघात अमोल दुश्मन (कर्णधार), अथर्व भागवत, विकास गायकवाड, ऋषी येणारे, गणेश बोरुडे, महेश रेपाळे, सुधीर पोटे, अरुण पवार, विजय आल्हाट, संतोष वारे, आदेश कोरडे आणि संदीप खुळे यांचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी आपापल्या भूमिकेत उत्तम योगदान देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन स्वप्नील गायकवाड व दीपक गायकवाड यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. स्पर्धेदरम्यान शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले. अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या यशामुळे परिसरात क्रीडा क्षेत्राबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये क्रिकेटविषयी अधिक उत्साह दिसून येत आहे. आकाश चौधरी संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *