चिंचोली: मागील वर्षी मळगंगामाता यात्रेदरम्यान चिंचोली ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा मान राखत, जिल्हा परिषदेचे मा.उप अध्यक्ष शिवसेना नेते सुजित पाटील झावरे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी घाट उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. या शब्दाची आज यशस्वी पूर्तता झाली असून, चालू वर्षी घाटात बैलगाडा शर्यतीचा जंगी थरार पाहायला मिळाला.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने बैलगाडा मालक आणि शौकीन दाखल झाले होते. घाटात रंगलेली चुरस आणि बैलगाड्यांचा वेग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुजित पाटील झावरे यांच्या या ‘वचनपूर्ती’बद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

🔶🔶🔶🔶🔶
शब्दाला जागणारा नेता’…
विकासाचा शब्द सुजित पाटलांनी पाळला!…
सतीश पिंपळकर यांच्याकडून सुजित पाटील झावरे यांच्या कार्याचा गौरव चिंचोली गावच्या विकासासाठी सुजित पाटील झावरे यांचे मोठे योगदान आहे. गावच्या पायाभूत सुविधांपासून ते मळगंगामाता देवस्थानच्या विकासापर्यंत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. बैलगाडा घाटाचा शब्द पूर्ण करून त्यांनी ग्रामस्थांची वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण केली, चिंचोली गावातील पिंपरकर माळा रस्ता. सातपुते वस्ती रस्ता बंधारा मळाई वाडजाई देवी या तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना, दुमा मळगंगा मंदिर रस्ता अशी अनेक विकासात्मात व रचनात्मक कामे सुजित झावरे पाटील यांनी केले आहे. असे गौरवोद्गार माजी सरपंच सतीश पिंपळकर यांनी यावेळी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *