पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील पाबळ ग्रामस्थांनी केलेली मागणी पूर्ण झाली असून आमदार काशिनाथ दाते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाच्या आदेशानुसार पारनेर आगारप्रमुखांनी पारनेर-अळकुटी मार्गे पाबळ अशी नवीन एस.टी. बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही नवी बससेवा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाली. सेवेच्या शुभारंभानिमित्त पाबळ ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बसच्या चालक-वाहकांचा सत्कार करून त्यांचे मनापासून आभार मानले. या निर्णयामुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल आमदार काशिनाथ दाते यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पाबळ गाव तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, तालुका युवा उपाध्यक्ष शिवराज कदम, संतोष कापसे, राजेंद्र कवडे, भरत गोरडे, रामदास गोरडे, दिनेश कापसे, सीताभाऊ कवडे, लहू कवडे, कैलास कवडे, संतोष कवडे, नाथा कापसे, लक्ष्मण गोरडे, भाऊसाहेब गोरडे, देवराम गोरडे, अशोक गोरडे, अशोक कापसे, अनिल कापसे, किसन कवडे, साहेबराव कापसे, बाळासाहेब कापसे, योगेश कवडे, मोहम्मद सय्यद, बाबाजी कापसे, रंजनाताई कापसे, आरती कापसे, लता कापसे, मंदा गोरडे, रेश्मा कवडे, शितल कवडे, श्रुतिका दरेकर, अनिता कवडे, वृक्षा कवडे, यमुना कवडे, अलका कापसे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.




